Join us

पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, "एवढं धाडस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:33 IST

लारा दत्ताने घेतली पंतप्रधानांची बाजू?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) राजस्थान येथे प्रचार रॅलीत मुस्लिमांवर केलेल्या वक्तव्यावर बरीच चर्चा होत आहे. यामधून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी संपत्तीचं फेरवाटप केलं असं ते म्हणाले अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Dutta) नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. लाराने पंतप्रधानांची बाजू सावरुन घेतली आहे. काय म्हणाली लारा दत्ता वाचा.

पंतप्रधानांनी विधान करताना काळजी घ्यायला हवी होती का? लाराचं यावर काय म्हणणं आहे हे तिने'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. लारा दत्ता म्हणाली, "आपण सगळेच माणूस आहोत. आपण प्रत्येकालाच खूश ठेवू शकत नाही. जर आपणच ट्रोलिंगपासून स्वत:ला वाचवू शकत नाही तर पंतप्रधान तरी कसे अपवाद असतील. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार गोष्टींशी डील करतो. कोणी नाराज होऊ नये म्हणून प्रत्येकाला समजून घेणं शक्य होत नाही."

ती पुढे म्हणाली, "जे सत्य आहे आणि जे तुमचं मत आहे ते सांगण्यासाठी तुम्हाला तेवढं प्रामाणिक राहावं लागतं. जर त्यांच्यात ते धाडस आहे तर ते कौतुकास्पद आहे. भारत असा देश आहे जो चालवणं कठीण आहे. पण इथली लीडरशिप चांगली आहे. शिक्षित लोकांनीही राजकारणात यायला पाहिजे."

लारा दत्ता आगामी 'रणनीति: बालाकोट अँड बियाँड' मध्ये दिसणार आहे. यामध्ये जिमी शेरगिलचीही भूमिका आहे. बऱ्याच काळानंतर लारा दत्ता स्क्रीनवर झळकणार आहे.

टॅग्स :लारा दत्ताबॉलिवूडनरेंद्र मोदी