Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लागीर झालं जी’ फेम अज्याच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, ​वारंवार पाहिला जातोय त्याचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 14:16 IST

​‘लागीर झालं जी’ मालिका तुफान गाजली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाण प्रकाशझोतात आला होता. नितीशने साकारलेला 'अज्या' अधिक भाव खावून गेला.

‘लागीर झालं जी’ फेम अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. त्याचे आगामी प्रोजेक्ट्स फोटो व्हिडीओ प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगत असतो. त्यामुळे नितीशचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने चाहते त्याला फॉलो करतात. 

अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा नितीश आता त्याच्या डान्सनेदेखील चाहत्यांची मनं जिंकत आहे. सोशल मीडियावर त्याने त्याचा एक डान्सिंग व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. नितीशनने असे अनेक एकसे बढकर एक डान्स व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तो एक उत्तम डान्सरसुद्धा असल्याचे समोर आले आहे.फॅन्स नितीशच्या डान्सिंगवर फिदा आहेत.

त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला असून तो व्हायरल होत आहे. व्हिडीओत अतिशय मजेशीर अंदाजात तो डान्स करताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतायेत.नितीशचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे डान्स करताना नितीशची ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

​‘लागीर झालं जी’ मालिका तुफान गाजली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाण प्रकाशझोतात आला होता. नितीशने साकारलेला 'अज्या' अधिक भाव खावून गेला. मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याला रसिक विसरलेले नाहीत.अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरला आहे. तुमच्या लाडक्या अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाण त्याच्या डॅशिंग लूकमुळेही चर्चेत असतो. मेकओव्हर, लूक बदलणे, स्टायलिश राहणे त्यालाही प्रचंड आवडते. रिअल लाईफमध्ये तो अतिशय मनमौजी आहे. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे त्याच्या ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळतंय.

टॅग्स :नितीश चव्हाणलागिरं झालं जी