Join us
Daily Top 2Weekly Top 5

KWK 8 : प्रणिती शिंदेंच्या भाच्याला डेट करतेय जान्हवी कपूर; स्वत:च केली पोलखोल, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:18 IST

'कॉफी विथ करण ८' मध्ये जान्हवीने तिच्या डेटिंग लाइफबद्दल खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवी आणि खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कपूर घराण्यातील या दोन्ही बहिणींच्या डेटिंगबाबत तुफान चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि खुशीने नुकतंच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

'कॉफी विथ करण ८' मध्ये जान्हवीने तिच्या डेटिंग लाइफबद्दल खुलासा केला आहे. करणने विचारलेल्या प्रश्नांना जान्हवी आणि खुशीने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. पण, करणच्या रॅपिड फायरमध्ये जान्हवी गोंधळली आणि तिने स्वत:च तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचं नाव घेतलं. करणने जान्हवीला "तुझ्या मोबाईलच्या स्पीड डायलमधील टॉप ३ नावं सांग", असा प्रश्न विचारला. करणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना जान्हवीने शिखर पहाडियाचं नाव घेत स्वत:चीच पोलखोल केली. 

"पप्पा, खुशू आणि शिकू", असं उत्तर जान्हवी देते. वडील बोनी कपूर आणि खुशी कपूर यांच्याबरोबर जान्हवी शिखर पहाडियाचं नाव घेते. त्यानंतर खुशी आणि करण हसायला लागतात. दरम्यान, गेल्या अनेक काळापासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवी आणि शिखरला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. आता कॉफी विथ करणमध्ये जान्हवीच्या उत्तराने त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झालं आहे. 

कोण आहे शिखर पहाडिया? 

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंची मोठी मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे.  

टॅग्स :जान्हवी कपूरकरण जोहरसुशीलकुमार शिंदेप्रणिती शिंदे