Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझा तुझ्यावर विश्वास आहे कारण.."; कुशल बद्रिके प्रसाद ओकला असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:40 IST

कुशल बद्रिकेने प्रसाद ओकवर एका खास कारणासाठी विश्वास ठेवलाय. काय घडलंय नेमकं बघा.

कुशल बद्रिके हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कुशलला आपण विविध भूमिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. कुशल सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो.  कुशलने एका खास कारणाने प्रसाद ओक, रवी जाधव आणि विजू मानेंवर विश्वास ठेवलाय. त्यासाठी कुशलने सोशल मीडियावर लोकमत फिल्मीची पोस्ट करुन त्यावर खास कॅप्शन लिहिलंय. काय घडलंय नेमकं.. आम्ही सांगतो.

काही दिवसांपुर्वी प्रसाद ओक म्हणाला होता, "दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की, ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर्स. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे, जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच. जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजीत पानसे.. अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची, जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला तरी वाटतं नाही."

प्रसादच्या या वक्तव्यावर कुशलने रिप्लाय केलाय. "माझा तुझ्यावर विश्वास आहे.." असं कॅप्शन कुशलने लिहिलंय. कुशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर..  चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कुशलने सर्वांना खळखळून हसवलं.  आता कुशल मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमध्ये झळकतोय. या शोमध्ये कुशलसोबत मराठमोळे कलाकार म्हणजेच अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता गौरव मोरे दिसत आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक कुशल बद्रिकेहेमांगी कवीचला हवा येऊ द्या