Join us

भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी; 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' शेअर केला मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:33 IST

Kushal Badrike: या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आरामात झोपलेला दिसत आहे. आणि, भाऊ ज्या पद्धतीने झोपला आहे त्या स्थितीला कुशलने एक खास नाव दिलं आहे.

आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी योग करतानाचे त्यांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात काहींनी योग करण्याचं महत्त्वं सांगितलं आहे. तर, काही सेलिब्रिटींनी फिटनेसचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला आहे. यामध्येच कुशल बद्रिकेने चला हवा येऊ द्या सेटवर भाऊ कदमने कशा प्रकारे योग दिन साजरा केला याची एक झलक व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 'चला हवा येऊ द्या'फेम स्नेहल शिदमने शूट केला असून या व्हिडीओमध्ये कुशलने भाऊ कदमचा योग दिन कसा गेला हे सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आरामात झोपलेला दिसत आहे. आणि, भाऊ ज्या पद्धतीने झोपला आहे त्या स्थितीला कुशलने एक खास नाव दिलं आहे. या आसनाला ढाराढुरासन म्हणतात असं म्हणत त्याने भाऊची खिल्ली उडवली. विशेष म्हणजे संपूर्ण व्हिडीओ शूट होत असताना भाऊला एकदाही जाग आली नाही. त्यामुळे या व्हिडीओवर अनेक जण मजेशीर कमेंट करत आहेत.

टॅग्स :कुशल बद्रिकेभाऊ कदमटेलिव्हिजनसेलिब्रिटीआंतरराष्ट्रीय योग दिन