Join us

'छोरी २'मधील सोहा अली खानचा भयानक लूक पाहून घाबरलेला कुणाल खेमू, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:27 IST

Soha Ali Khan : अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या करिअरमध्ये कधीही खलनायकाची भूमिका साकारली नाही. पण आता ती तिच्या आगामी चित्रपट 'छोरी २'मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री सोहा अली खान(Soha Ali Khan)ने तिच्या करिअरमध्ये कधीही खलनायकाची भूमिका साकारली नाही. पण आता ती तिच्या आगामी चित्रपट 'छोरी २' (Chhori 2 Movie) मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हॉरर थ्रिलर चित्रपटात ही अभिनेत्री याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात आलेला अनुभव नुकताच सोहा अली खानने शेअर केला आहे. 

आगामी 'छोरी २' या चित्रपटात ती हटके अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. तिच्या दीर्घ कारकिर्दीत सोहा पहिल्यांदाच 'छोरी २'मध्ये भुताची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नुसरत भरुचाही दिसणार आहे. या चित्रपटासाठी सोहाने कशी तयारी केली याबद्दल अभिनेत्रीने मोकळेपणाने सांगितले. तिने सांगितले की, जेव्हा ती छोरी २ चे शूटिंग करत होती तेव्हा तिचा पती कुणाल खेमू देखील तिला घाबरला आणि त्याने अभिनेत्रीपासून अंतर ठेवले होते. हॉरर थ्रिलरमध्ये ती 'दासी माँ'च्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोहाने या चित्रपटासाठी तिच्यातील वाईट गोष्टींचा पर्दाफाश केला, ज्याने केवळ प्रेक्षकच नाही तर तिचा नवरा कुणालही अस्वस्थ केले.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोहा अली खानने सांगितले की, ''जेव्हा ती दासी माँच्या मेकअपमध्ये होती तेव्हा ती तिच्या मुलीपासून आपला चेहरा लपवत होती. तिच्या भूत मेकअपने तिचा पती कुणालही घाबरला होता.''  सोहा म्हणाली, "मी त्या लूकमध्ये बराच वेळ शूटिंग करत होते. सहसा मी झोपेच्या वेळेत घरी पोहोचत असे पण त्या दिवशी मी रात्री शूटवर होते. जर मी त्यावेळी शूटिंग करत असेल तर मी माझ्या मुलीला फेसटाइम करायचे. मात्र त्यादिवशी भूतीणीच्या मेकअपमध्ये असल्याने मला असे करायचे नव्हते. ती मला वारंवार व्हिडीओ कॉल करत होती आणि मी तिचा कॉल डिस्कनेक्ट करुन ऑडिओ कॉल करत होते. मी म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेव, तुम्ही मला झोपताना असे पाहू शकत नाही.'' मी कुणालला म्हणाले, ''तू माझ्या कॉलला उत्तर दे.' तो म्हणाला, 'नाही, माझ्याशी दोन महिन्यांनी बोल.'' 'छोरी २' सिनेमा ११ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

टॅग्स :सोहा अली खाननुसरत भारूचा