Join us

'कृतांत'चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:15 IST

रेनरोज फिल्म्स अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेला 'कृतांत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

ठळक मुद्दे'कृतांत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला'कृतांत' चित्रपटात संदीप कुलकर्णी मुख्य भूमिकेत

रेनरोज फिल्म्स अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेला 'कृतांत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वा सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेते संदिप कुलकर्णी यांच्या हटके लूकची यावेळी बरीच चर्चा झाली होती. आता 'कृतांत'चा मोशन टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'कृतांत' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवर शेअर करून लिहिले की आता होणार मनाच्या अशांतततेचा शांततेकडे जाणारा थरारक प्रवास सुरू!

रेनरोज फिल्म्स अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या कृतांतचे दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केले आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कृतांतचे कथानक आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. संदिपच्या जोडीला या सिनेमात सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहे. विजय मिश्रा या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिले आहे. दत्ताराम लोंढे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

टॅग्स :संदीप कुलकर्णी