Join us  

पहचान कौन? फोटोत दिसणारा हा क्युट मुलगा कॉमेडी विश्वात गाजवतोय अधिराज्य, त्याच्या शेजारील मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 7:00 AM

Guess Who: एका प्रसिद्ध अभिनेत्याचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्हीही तो कोण आहे हे ओळखू शकणार नाही. त्यांच्या शेजारी उभी असलेली मुलगीही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Guess Who Is This Star: बॉलिवूड असो किंवा टीव्ही, प्रत्येक स्टारचे एक मोठं फॅन फॉलोइंग आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेकदा सोशल मीडियावर स्टार्सचे न पाहिलेले फोटोही खूप व्हायरल होतात, जे पाहून काही वेळा चाहत्यांनाही त्यांना ओळखता येत नाहीत. अलीकडेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचे बालपणीचे फोटो व्हायरल होतो, जे पाहून तुम्ही त्याला ओळखू शकत नाही.

अनेक मोठ्या स्टार्ससोबत केलंय कामफोटोत दिसणारा हा क्युट मुलागा आज मनोरंजनाच्या जगात खूप लोकप्रिय आहे. आज या मुलाने केवळ टीव्हीच नाही तर बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. कॉमेडीच्या जगातील देखील हा बादशाह आहे. जर तुम्ही हा मुलगा कोण हे अजूनही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला आमखी एक हिंट देतो.  फोटोत दिसणाऱ्या या मुलाने अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  ते अजय देवगण (Ajay Devgn)आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)  यांसारख्या स्टार्ससोबतही दिसले आहे.

फोटोत दिसणारा हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा(Govinda)चा भाचा  कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)आहे. कृष्णाने 'क्या कूल हैं हम 3', 'बोल बच्चन', 'तेरी भाभी है पगले', 'एंटरटेनमेंट' आणि '2 चेहरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 'द कपिल शर्मा शो', 'कॉमेडी सर्कस', 'कॉमेडी नाइट्स बचाओ', 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह', 'ये मेरा इंडिया' आणि 'द ड्रामा कंपनी' सारख्या शोमध्ये काम केले आहे. तो 'बू सबकी फतेगी' या ओटीटी मालिकेतही दिसला आहे. आजकाल कृष्णा त्याची पत्नी कश्मिरा शाहसोबत 'बिग बॉस 16'  होस्ट करत आहे.

  शेजारी उभी असलेली मुलगी देखील एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री फोटोमध्ये कृष्णाच्या शेजारी दिसणारी मुलगी त्याची बहीण आरती सिंह (Aarti Singh) आहे. आरती हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने 'मायका', 'गृहस्थी', 'थोडा है बस थोडा की जरूरत है', 'उतरन', 'ससुराल सिमर का' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ती 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13)मध्ये ही ती होती.   

टॅग्स :कृष्णा अभिषेकटिव्ही कलाकार