Join us

क्रांती रेडकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:40 IST

Kranti Redkar : क्रांती रेडकर छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ​​जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो, कुणी घर देता का घर, गंगाजल अशा हिंदी आणि मराठी चित्रपटात ती झळकली आहे. काकन चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर ती आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दरम्यान ती क्रांती रेडकर हिचे छोट्या पडद्यावर आगमन होत आहे. येत्या १ जुलै २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन शोमध्ये दिसणार आहे. या शोचं नाव आहे ढोलकीच्या तालावर. 

ढोलकीच्या तालावर या रिअॅलिटी शो मध्ये लावणी कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळवून देत आहे. या शोमध्ये क्रांती रेडकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रांती सोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील आणि दिग्दर्शक अभिजित पानसे हे दोघेही परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ढोलकीच्या तालावर या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीने एक वेबसाईटवर उपलब्ध करून दिली होती .त्यावर स्पर्धकांना त्यांचे लावणीचे व्हिडीओ पाठवायचे होते. यातूनच ठराविक स्पर्धक निवडण्यात येणार आहेत. तेव्हा आता हे स्पर्धक मंच गाजवण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत.

क्रांती रेडकर या मंचावरून परीक्षक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परीक्षकाच्या भूमिकेतून तिचा हजरजबाबीपणा या मंचावर देखील प्रेक्षकांना लवकरच अनुभवायला मिळेल. तसेच प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे यांचेही मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकांना भेटणार आहे.
टॅग्स :क्रांती रेडकर