Join us
Daily Top 2Weekly Top 5

'5 वर्षे हा मुलगा रुईयामध्ये माझ्या...', क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्यासोबतचा गोड व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:25 IST

क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

क्रांती रेडकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री प्रत्येकवेळी आपल्या नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. दोघेही वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध पोस्टद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. क्रांतीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

क्रांतीनं नवऱ्याबरोबरच रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हे जोडपं आईसक्रिम खाताना दिसत आहे.  क्रांतीनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, '५ वर्षे हा मुलगा रुईयामध्ये माझ्या वर्गात होता आणि मला तरी माहित होते का एक दिवस तोच माझ अख्ख जग बनेल'. त्यांच्या गोड व्हिडीओवर खूप कमेंट्स व लाइक्स येत आहेत. 

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी २०१७ मध्ये  लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा असे त्यांच्या मुलींची नावे आहेत. क्रांती आणि समीर यांचा अगदी सुखाचा संसार सुरू आहे. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

टॅग्स :क्रांती रेडकरसमीर वानखेडेसेलिब्रिटीमराठी अभिनेता