Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती रेडकर करणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 06:30 IST

क्रांती रेडकर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

 'झी युवा'वर एक खास 'मैफिल' लवकरच रंगणार आहे. संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. 'मैफिल'च्या प्रत्येक भागात एक विशेष पाहुणा मंचावर उपस्थित असेल. त्याच्या साथीने गप्पा आणि संगीताची एक अनोखी मैफिल रंगेल. क्रांती रेडकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ९ डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 

डान्स आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी क्रांती उत्तम सूत्रसंचालक सुद्धा आहे. अर्थात, टीव्हीवरील कार्यक्रमात ती पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार आहे. काही काळापूर्वी दिग्दर्शक म्हणूनही क्रांतीने पदार्पण केलेले आहे. या निराळ्या, खास, कोऱ्या करकरीत कार्यक्रमात ती निवेदक म्हणून पाहायला मिळणार आहे.

याविषयी बोलताना क्रांती म्हणाली की, "झी युवा सोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणं, ही गोष्ट खूपच आनंदाची आहे. निवेदन करणं, अभिनय आणि नृत्यापेक्षा माझ्यासाठी थोडं अधिक आव्हानात्मक आहे. म्हणूनच, सूत्रसंचालक म्हणून पुन्हा काम करणं ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. मला या नव्या भूमिकेत पाहणं आणि हा नावीन्यपूर्ण संकल्पना असलेला कार्यक्रम, या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना आवडतील याची मला खात्री वाटते."

टॅग्स :क्रांती रेडकरझी युवा