Join us

फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन

By देवेंद्र जाधव | Updated: August 1, 2025 14:49 IST

बाई मी पतंग उडवीत होते लावणीवर कोरियन मुलींचा झक्कास डान्स. व्हिडीओ तुफान व्हायरल आणि नेटकऱ्यांची पसंती. तुम्हीही बघा

महाराष्ट्राची कला सातासमुद्रापार पोहोचली आहे. ही कला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मराठी कलाकारांचंही तितकंच योगदान आहे. महाराष्ट्राची अशीच एक कला म्हणजे लावणी. तमाशा कलावंतांनी लावणीचे गावागावात प्रयोग करुन ही कला सामान्य माणसांत रुजवली. याच लावणीची भुरळ आता परदेशी नागरिकांनाही पडली आहे. कोरियन महिलांनी चापून चोपून साडी नेसत मराठी लावणीवर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोरियन महिलांनी केली लावणी

कोरियन तरुणींचा लावणीवर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'बाई मी पतंग उडवीत होते', या लावणीवर या तरुणींनी ठेका धरलाय. व्हिडीओत तीन कोरियन तरुणी दिसत आहेत. लाल, निळी आणि जांभळी साडी या तिघींनी परिधान केली आहे. याशिवाय दागिन्यांचा शृंगार केला आहे.  'बाई मी पतंग उडवित होते' गाण्यावर या तिन्ही तरुणींनी झक्कास डान्स केलाय. व्यवस्थित अन् लयबद्ध ताल धरत, प्रत्येक डान्स स्टेप नीट करत या तरुणींनी हा डान्स केलाय. त्यांच्या डान्स व्हिडीओला अनेकांनी दाद दिली आहे.

या मराठी अभिनेत्रीने केलीये कोरिओग्राफी

कोरियन तरुणींनी जी झक्कास लावणी केली त्यामागे मराठी अभिनेत्रीचं असलेलं कनेक्शन समोर आलंय. मराठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना आदिती भागवत यांनी या तीन कोरियन तरुणींना लावणी शिकवली असल्याची चर्चा आहे. आदिती या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लावणी करताना आणि शिकवताना दिसतात. आदिती अनेक परदेशी मुला-मुलींसोबतचे व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. कोरियन तरुणींनी सुंदर लावणी करण्यामागे आदिती भागवत यांचा मोलाचा वाटा आहे

टॅग्स :मराठीमराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी गाणीटिव्ही कलाकार