कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लयुन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) हिने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत (kunal bhagat) १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणात मालवणमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तिचा रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे.
अंकिता वालावलकरचा नवरा कुणाल भगतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ते दोघे समुद्रकिनारी हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, इश्क है ये इश्क है. तर या व्हिडीओवर देखील कॅप्शन टाकले आहे. त्यात लिहिले की, सोचो कितनी खुबसूरत हो जाएगी ये जिंदगी जब दोस्त, मोहब्बत और हमसफर तीनो एक ही इंसान हो. इश्क है ये इश्क है. या व्हिडीओवर अंकितानेदेखील कमेंट केलीय. तिने लिहिले की, ओहो..कुणाल भगत रिळा बनवक शिकलस रे... त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतची लव्हस्टोरीही खूपच हटके आहे. अंकिता ही सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर, अभिनेत्री आहे. अंकिता आणि कुणालची पहिली भेट एका पुरस्कार सोहळ्यात झाली होती. झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये अंकिता सूत्रसंचालन करत होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि तर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता दोघांनी लग्न केले. अंकिताला 'बिग बॉस मराठी ५' शोमधून खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे.