Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवबागच्या समुद्रकिनारी रंगला कोकण हार्टेड गर्लचा संगीत सोहळा; कुणालसह अंकिताचा डान्स, व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:34 IST

मेहेंदी सोहळा आणि साखरपुड्यानंतर आता अंकिता-कुणालच्या संगीत सोहळ्याचे खास क्षण समोर आले आहेत.

बिग बॉस मराठी फेम आणि कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अंकिता सुप्रसिद्ध संगीतकार कुणाल भगतसोबत सप्तपदी घेणार आहे. कोकणात अंकिता आणि कुणालचा लग्नसोहळा पार पडणार असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेहेंदी सोहळा आणि साखरपुड्यानंतर आता अंकिता-कुणालच्या संगीत सोहळ्याचे खास क्षण समोर आले आहेत. 

अंकिता आणि कुणालचा नुकताच साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या संगीत नाईटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. शनिवारी रात्री कोकणातील देवबागच्या समुद्रकिनारी अंकिता आणि कुणालचा संगीतसोहळा पार पडला. त्यांच्या संगीत सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं. अंकिता आणि कुणालने संगीत सोहळ्यासाठी वेस्टर्न आऊटफिटला पसंती दिली होती. अंकिताने लाल रंगाचा वन पीस घालत ग्लॅमरस लूक केला होता. तर कुणालने ब्लेझर घातला होता. त्यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत अंकिता आणि कुणाल एन्ट्री घेताना दिसत आहेत. शनिवारी अंकिताचा वाढदिवसही होता. अंकिताच्या वाढदिवसाचंही सेलिब्रेशन करण्यात आलं. दरम्यान, अंकिता आणि कुणाल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरबिग बॉस मराठीसेलिब्रेटी वेडिंग