Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनू कक्कर आहे विवाहित; जाणून घ्या कोण आहे तिचा पती, खास आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:00 IST

बॉलिवूडची सिंगर नेहा कक्कर हिच्या पतीबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण नेहाची मोठी बहीण सोनू कक्कर हिच्या पतीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?

ठळक मुद्देसोनू कक्कर व नीरज शर्माची लव्हस्टोरीही खास आहे. सोनूने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.

बॉलिवूडची सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) हिच्या पतीबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण नेहाची मोठी बहीण सोनू कक्कर (Sonu Kakkar) हिच्या पतीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? सोनू विवाहित आहे आणि तिच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. होय, नेहा व तिचा पती रोहनप्रीत दोघेही लाईमलाईटमध्ये असतात. पण नेहाचा जीजू म्हणजेच सोनूचा पती (Sonu Kakkar's Husband) मात्र लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतो. 

सोनूच्या पतीचे नाव नीरज शर्मा आहे. 20 डिसेंबर 2006 मध्ये सोनू व नीरज यांचे लग्न झाले. मात्र सोनूच्या कुठल्याच इव्हेंटला नीरज दिसत नाही. सोनू कक्कर बॉलिवूडची एक लोकप्रिय सिंगर आहे तर तिचा पती नीरज शर्मा हा क्रिएटीव्ह डायरेक्टर व रिअ‍ॅलिटी शोचा फाऊंडर आहे. 

गेल्यावर्षी व्हॅलेन्टाईन डेला नीरजने पत्नी सोनूला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. सोनूने या कारसोबतचे फोटोही शेअर केले होते. सोनू कक्कर सध्या ‘इंडियन आयडल 12’ जज करतेय. नेहा सध्या शोमधून गायब आहे. तिच्या जागी जज म्हणून तिची वर्णी लागली आहे.

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी...सोनू कक्कर व नीरज शर्माची लव्हस्टोरीही खास आहे. सोनूने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. तिने सांगितले होते की, ‘आम्ही पहिल्यांदा भेटलो, ती भेट मुळातच खास होती. म्हणायला आम्ही नुसत्या गप्पा मारल्या होत्या. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला होता. एकदिवस अचानक मी तुझ्यावर प्रेम करतो, असा त्याचा मॅसेज आला. त्या मॅसेजवर काय बोलू, हेच मला कळेना. मी त्याच्याशी बोलले तेव्हा चक्क लाजत होते. तू माझी मस्करी करतोय का? असा माझा प्रश्न होता. यावर मी खरं बोलतोय, हे त्याचे उत्तर होते. तो कधीच माझ्या प्रेमात पडला होता. हळूहळू मलाही तो आवडायला लागला. यानंतर आम्ही आमच्या नात्याबद्दल कुटुंबीयांना सांगितले आणि लग्न केले.’

टॅग्स :नेहा कक्करइंडियन आयडॉल