Join us

44 वर्षांची ही हिरोईन आजही दिसते हॉट, पण ब्रेक पडला महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 17:08 IST

आज ती 44 वर्षांची आहे. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो.

ठळक मुद्दे ‘देसी बॉइज’ सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती. यानंतर इनकार, आय, मी और मै अशा अनेक सिनेमांत ती झळकली.

बॉलिवूडची ग्लॅमगर्ल चित्रांगदा सिंग हिने कधीच वयाची चाळीशी ओलांडली. आज ती 44 वर्षांची आहे. पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो. दीर्घकाळापासून चित्रांगदा बॉलिवूडमधून गायब आहे. नाही म्हणायला अलीकडे एकदोन सिनेमात ती दिसली. पण तेवढ्यापुरतीच. चित्रांगदाला बॉलिवूडमध्ये फारसे म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. याचे कारण म्हणजे, तिने घेतलेला ब्रेक.

होय, स्वत: चित्रांगदाने याचा खुलासा केला होता. ‘मी करिअरला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात अशी अनेक वळण आली ज्यांनी आयुष्याची प्राथमिकता बदलत गेल्या. मी सिनेमात पाऊल ठेवले आणि त्यानंतर तब्बल चार वर्षांचा ब्रेक घेतला.त्यानंतर मी पुन्हा एकदा सिनेमात आले आणि पुन्हा दोन वर्षांचा ब्रेक घेतला. संधी मिळत असताना मी त्या नाकारल्या. याचे परिणाम मला भोगावे लागले, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

चित्रांगदा बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. 

सन 2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधावासोबत चित्रांगदाने लग्नगाठ बांधली होती. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. कालांतराने दोघांचाही घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा आहे. असे म्हणतात की, मुलाच्या जन्मानंतर चित्रांगदाला सिनेमात परतायचे होते. पण तिच्या पतीला हे मान्य नव्हते. त्यामुळे दोघांचे वाद विकोपाला गेलेत. काहींच्या मते, चित्रांगदाच्या अफेअरच्या बातम्यांमुळे हे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले.

 चित्रपटात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंगनंतर चित्रांगदाने म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले. हजारो ख्वाहिशे ऐसी’ या सिनेमामधून चित्रांगदाने करिअरला सुरुवात केली.   ‘देसी बॉइज’ सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती. यानंतर इनकार, आय, मी और मै अशा अनेक सिनेमांत ती झळकली.

 

टॅग्स :चित्रांगदा सिंग