Join us

लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 10:28 IST

Jhund : अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी नागराज यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यात. आता अभिनेता किरण माने यांनीही चित्रपटाबद्दल  पोस्ट शेअर केली आहे.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. समीक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली. प्रेक्षकांनीही सिनेमाला पसंती दर्शवली. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं.  जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी नागराज यांच्या या चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यात. आता अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनीही चित्रपटाबद्दल  पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये मानेंनी झुंड आणि नागराज यांचं कौतुक केलं आहे. या पोस्टसह त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली आहे.

 माने लिहितात... नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘ तुझ्या येण्याअगोदर’ एक पत्र ही कविता वाचून अस्वस्थ झालोवतो. आज या कवितेचं  ‘महाकाव्य’  करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोयस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस...सहजपणे... ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा...,असं किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :नागराज मंजुळेकिरण मानेझुंड चित्रपट