Join us

जुगारामुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; मुलांचा सांभाळ करण्यासाठी विकावे लागतायेत कपडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 14:33 IST

Hollywood actress: ही अभिनेत्री पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं वाईट. अनेकदा एखाद्या गोष्टीचा अतिरेक केल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. आपल्या एकाच चुकीची शिक्षा संपूर्ण कुटुंबालाही यामुळे भोगावी लागू शकते. सध्या असंच काहीसं एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बाबतीत घडलं आहे. जुगाराचा नाद लागल्यामुळे या अभिनेत्रीने तिचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करुन घेतलं. कर्जाचा डोंगर झाल्यामुळे तिच्यावर अक्षरश: कपडे विकायची वेळ आली.

एकेकाळची हॉलिवूड प्रसिद्ध जोडी म्हणजे कीम जोलिस्क आणि क्रॉय बर्मन. अलिकडेच या जोडीचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. मात्र, या घटस्फोटोनंतर कीमचं आयुष्य पार बदलून गेलं आहे. कीमवर कर्जाचा मोठा डोंगर असून कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी तिच्यावर खटला दाखल केला आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आणि ४ मुलांचं संगोपन करता यावं यासाठी कीमने चक्क तिचे महागडे कपडे सोशल मीडियावर विकल्याचं सांगण्यात येतं.

मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, कीम 2,49,43,320 कोटी रुपये इतक्या संपत्तीची मालकीन आहे. मात्र, गेल्या काही काळात तिला जुगाराची सवय लागल्यामुळे तिच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. इतकंच नाही तर किरकोळ खर्च भागवता यावेत यासाठी तिने सोशल मीडियावर चक्क तिचा एक ड्रेस विकला. कीमने तिचा ड्रेस ४ लाख ९० हजार ५६४ रुपयांना विकल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, कीमने आतापर्यंत अनेक गोष्टी विकल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही तर घटस्फोटानंतर तिच्या नवऱ्याच्या क्रॉय बर्मनच्या ज्या वस्तू तिच्याकडे होत्या त्यांचाही तिने लिलाव केल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा