Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' बायोपिकमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या अपोझिट लागली कियाराची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 13:11 IST

कियारा गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज या तिच्या वेबसीरिजला घेऊन चर्चेत आहे, ज्याचे दिग्दर्शन करण जोहरने केेले आहे.

ठळक मुद्देयासिनेमाच्या माध्यमातून विष्णु दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. 

सिद्धार्थ मल्होत्राच्या अय्यारी सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा काही कमाल दाखवू शकला नाही. मात्र सिद्धार्थने आता त्याचा आगामी सिनेमाच्या तयारी सुरुवात केली आहे. सिद्धार्थ लवकरच विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यासिनेमात काम करण्यासाठी सिद्धार्थ उत्सुक आहे. आता अशी माहिती मिळतेय की या चित्रपटात कियारा आडवाणीची वर्णी लागली आहे. 

कियारा गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज या तिच्या वेबसीरिजला घेऊन चर्चेत आहे, ज्याचे दिग्दर्शन करण जोहरने केेले आहे. यातल्या काही बोल्ड दृश्यांना घेऊन कियारा चर्चेत आली होती. विक्रम बत्राच्या बायोपिकबाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा कागरिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि शब्बीर बॉक्सवाला एकत्र येऊन करणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन विष्णु वर्द्धन करणार आहे. यासिनेमाच्या माध्यमातून विष्णु दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतो आहे. 

कियाराने 'फगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. दोघे ही एका हिटच्या शोधात आहे. प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि कियाराची जोडी किती आवडते हे आपल्याला सिनेमा रिलीज झाल्यावर कळेल.

अय्यारी फ्लॉप गेला तरी सिद्धार्तकडे कामाची कमी नाही. तो एकता कपूरच्या 'शॉटगन शादी' आणि 'ये दिल मांगे मोर' आणि कन्नड सुपरहिट चित्रपट 'किरिक पार्टी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. मात्र आता सिद्धार्थच्या 'किरिक पार्टी' चित्रपटाला काही अडचणींचा सामना करावा लागतोय. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्राने 'अय्यारी'च्या आधी 'किरिक पार्टी' साईन केला होता. मात्र तेव्हापासून आतापर्यंत या प्रोजेक्टला घेऊन काही खास काम झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपट रखडण्या मागचे कारण आहे याला अभिनेत्री मिळत नाहीय. 

 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्राबॉलिवूड