अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. १५ जुलै रोजी सिद्धार्थ आणि कियाराच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. मल्होत्रा आणि अडवाणी दोन्ही घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्यातच काल न्यू मॉम कियाराने वाढदिवस साजरा केला. आई म्हणून हा तिचा पहिलाच वाढदिवस असल्याने खूप खास होता. यासाठी तिच्यासाठी अगदी स्पेशल केक मागवण्यात आला होता. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.
कियारा अडवाणीने सोशल मीडियावर केकचा फोटो पोस्ट केला आहे. व्हाईट रंगाच्या केकवर आई आणि तिच्या कुशीत असलेल्या चिमुकलीची प्रतिकृती आहे. 'हॅपी बर्थडे की...वंडरफुल मम्मा' असं केकवर लिहिलेलं दिसत आहे. यासोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले, "सर्वात खास वाढदिवस.. माझी मुलगी, माझा नवरा आणि माझ्या आईवडील या माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत साजरा केला. या नवीन वर्षात पाऊल ठेवताना आमच्या दोघांचीही गाणी रिपीट मोडवर वाजत आहेत. यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद."
दुपारी जेवणात चिकन तर रात्री...; 'न्यू मॉम' कियारा 'वॉर २'मध्ये बोल्ड दिसण्यासाठी काय खायची?
कियारा अडवाणी लवकरच 'वॉर २'मध्ये दिसणार आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमातील तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तसंच यामध्ये तिने बिकिनी सीन्सही दिले आहेत. हृतिक रोशनसोबत तिची केमिस्ट्री गाजत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.