Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kedarnath Movie : सारा अली खान होती चिंतेत, आता मानले देवाचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 10:48 IST

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या अडचणीत सापडला आहे.  

ठळक मुद्देया सिनेमात साराच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत असणार आहेयेत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या अडचणीत सापडला आहे.  

या सिनेमात साराच्या अपोझिट सुशांत सिंग राजपूत असणार आहे. साराला एका मुलाखतीत केदारनाथच्या रिलीजमध्ये आलेल्या अडचणीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ''माझ्या डोक्यात सतत विचार असायचा की सर्व काही नीट होईल कि नाही. मी जर असे म्हणाल की केदारनाथच्या रिलीजमध्ये येणाऱ्या अडचणींचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही तर ते खोटे असेल. केदारनाथची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती हे मला अस्वस्थ करणार होते कारण हा माझा डेब्यू सिनेमा आहे या प्रोजेक्टशी मी जोडले गेलेले होते. मी दररोज गट्टू (कपूर) यांनी फोन करायचे आणि विचारायचे सर सर्वकाही ठिक आहेना ? मी देवाचे आभार मानते की अखेर सर्व अडचणी दूर होऊन सिनेमा रिलीज होतोय.''     

'केदारनाथ'च्या ट्रेलरमधील अनेक दृश्ये चित्तथरारक आहेत. काही दृश्ये तर थेट टायटॅनिक ट्रॅजिडीची आठवण करून देतात. सारा अली खान व सुशांत सिंग राजपूतची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

केदारनाथनंतर सारा रोहित शेट्टीच्या सिम्बामध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे. साराच्या पहिला सिनेमा रिलीज होण्याच्या आधीच तिच्या हाती बिग बजेटचे सिनेमा लागले आहेत.  

टॅग्स :केदारनाथसैफ अली खान सारा अली खान