Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सूरज रोज जे सहन करतोय...", 'झापुक झुपूक'मुळे सूरजला ट्रोल करणाऱ्यांना केदार शिंदेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:48 IST

"पूर्वीच्या काळी जर सोशल मीडिया असतं तर...", झापुक झुपूकमुळे सूरजला ट्रोल करणाऱ्यांना केदार शिंदेंनी सुनावलं

Kedar Shinde: केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित झापुक झुपूक हा सिनेमा २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या नव्या सिनेमातून बिग बॉस विजेता, गुलिगत किंग सूरज चव्हाण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, या चित्रपटात सूरज चव्हाणला कास्टिंगमुळे अनेकांकडून सूरजला ट्रोल करण्यात आलं. यावर केदार शिंदे स्पष्टपणे बोलले आहेत. 

अलिकडेच 'झापुक झुपूक' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने केदार शिंदेंनी 'प्लॅनेट मराठी'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान ते म्हणाले, "कधी कधी मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी जर सोशल मीडिया असतं तर आज सूरज रोज जे सहन करतोय, हा कोण आहे रे? याला का सिनेमात घेतलाय? काय दिसतो? सगळ्या गोष्टी तेव्हा सुद्धा आमच्या बाबतीत झाल्या असत्या. पण, शेवटी कोणीही काही बोललं तर आम्ही ट्रोल करणाऱ्यांची तोंडं बंद नाही  करु शकत. आम्ही फक्त आमचं काम त्यांना दाखवू शकतो. त्यामुळे २५ हा दिवस काही फार दूर नाही." असं म्हणत केदार शिंदे यांनी ट्रोलर्सना सुनावलं आहे. 

दरम्यान, सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी स्टारकास्ट आहे. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी चित्रपट