Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा कधी प्रदर्शित होणार, केदार शिंदेंची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:23 IST

सध्या महाराष्ट्रात एकाच नावची चर्चा आहे, तो म्हणजे सुरज चव्हाण.

सध्या महाराष्ट्रात एकाच नावची चर्चा आहे, तो म्हणजे सुरज चव्हाण.  'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर त्याच्यावर सर्वांकडूनच कौतुकांचा वर्षाव केला जातोय. राज्यभरातून सूरजला खूप प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय.  सूरज चव्हाण हा 'बिग बॉस'च्या घरात गेला, तेव्हा तो एक साधा रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, प्रामाणिकपणा, वैयक्तिक आयुष्यातील खडतर प्रवास यामुळे त्याने जनतेच्या मनात घर केलं. आता सूरज हा फक्त एक रिल्सस्टार नसून तो आता अभिनेता बनला आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेच्या मंचावरुनच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग डिरेक्टर केदार शिंदे यांनी  सुरज चव्हाणसोबत एक चित्रपट करणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याचीही घोषणा केली आहे. 'झापुक झुपूक' असे या सिनेमाचे नाव असणार आहे आणि हा सिनेमा येत्या २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सुरज चव्हाणसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. त्यात कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "एक नवीन प्रवास सुरू झाला... केदार शिंदे प्रोडक्शन आणि जीओ सिनेमा मराठी सादर करीत आहेत "झापूक झूपूक". 'बाईपण भारी देवा' नंतरची ही माझी कलाकृती. २०२५ मध्ये तुमच्या भेटीला येणार". या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. प्रेक्षकांना आता सुरज चव्हाण यांच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाची उत्सुकता लागून आहे. 

टॅग्स :केदार शिंदेबिग बॉस मराठी