Join us

फिटनेस फ्रिक असलेल्या अभिनेत्रीचा हा फोटो होतोय व्हायरल,सेलिब्रेटींनीही दिल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 14:27 IST

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली कविता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.

कविता कौशिक टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला एफआयआर या तिच्या मालिकेसाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना चांगली आवडली होती. सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. पण लवकरच तिला घराबाहेर पडावं लागलं. कविता कौशिककडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. पण ती त्या अपेक्षांवर खरी उतरू शकली नाही आणि शोमधून बाहेर झाली होती. 'बिग बॉस १४' च्या घरातून बाहेर येताच कविता मोठमोठे खुलासे करत आहे. जे फॅन्ससाठी धक्कादायक ठरले होते.

बिग बॉसच्या घरात स्पर्धक रूबीना दिलैक आणि कविता कौशिक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. दोघींमधील वाद इतकात विकोपाला गेले की, कविता थेट बिग बॉसच्या घराबाहेर पडली. कविता बिग बॉसच्या घराबाहेर पडताच, तिचा पती रोनित बिस्वासने काही शॉकिंग खुलासे केले होते.

हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी कविता मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र 'बिग बॉस १४' मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती जास्त चर्चेत आली होती. 

त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. बिग बॉसचा घरातून बाहेर पडल्यानंतर कविता  पुन्हा तिच्या फिटनेसकडे वळली. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली कविता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. 

त्यामुळेच की काय आपल्या फिटनेसमुळे ती आजच्या  अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी कविता बरीच मेहनत घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता.

या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. या फोटोला तिने कॅप्शनही दिली होती. स्वतःला वॉटर बेबी म्हणत नेहमीच पोहायला आवडतं असं तिने या कॅप्शनमधून सांगितलं होतं. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :कविता कौशिक