Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘झिरो’तील अनुष्का शर्माची भूमिका मिळवण्यासाठी कॅटरिना कैफ रडते तेव्हा...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 10:16 IST

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाला आणि चित्रपटाची चर्चा सुरु झाली. हा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर सर्वाधिक प्रशंसा होतेय ती अनुष्का शर्माची आहे. कदाचित म्हणूनचं, कॅटरिना कैफने अनुष्काची ही भूमिका मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाला आणि चित्रपटाची चर्चा सुरु झाली. हा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर सर्वाधिक प्रशंसा होतेय ती अनुष्का शर्माची आहे. कदाचित म्हणूनचं, कॅटरिना कैफने अनुष्काची ही भूमिका मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. होय, चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

होय, कॅटरिनाला या चित्रपटात अनुष्काची भूमिका करायची होती. ‘झिरो’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान शाहरुख यावर बोलला होता. कॅटरिनाना चित्रपटातील स्वत:ची भूमिका आवडलेली नाही, असे शाहरुख म्हणाला होता. यावर कॅटरिनाही बोलली होती. मला माझी भूमिका आवडलेली आहे. पण मी अनुष्काच्या भूमिकेच्या प्रेमात पडले आहे, असे ती म्हणाली होती. केवळ इतकेच नाही तर हे सांगताना ती भावूक झाली होती. ही भूमिका मिळवण्यासाठी मी खूप रडले. पण तरिही ही भूमिका मला मिळाली नाही. शेवटी मी बबिता कुमारीची भूमिका साकारली, असे तिने सांगितले होते. कॅटरिना खरोखरचं या भूमिकेसाठी रडली होती, याला आता आनंद एल राय यांनीही दुजोरा दिला आहे.आता अनुष्काच्या भूमिकेत इतके काय खास आहे, हे तर चित्रपट पाहिल्यानंतरचं कळेल. ‘झिरो’ हा चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होतोय. या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.   चित्रपटात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  श्रीदेवींनी मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअथार्ने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.  

टॅग्स :कतरिना कैफअनुष्का शर्माझिरो सिनेमा