Join us

200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 14:35 IST

उत्तराखंडच्या औली येथे दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गत 18 जून ते 22 जूनदरम्यान झालेल्या या लग्नाला २०० कोटी खर्च आला. 200 कोटींच्या या लग्नात कतरीना कैफ, रॅपर बादशाह, उर्वशी रौतेला, टीव्हीची नागीन सुरभी ज्योती अशा अनेकांनी परफॉर्मन्स दिलेत.

ठळक मुद्दे  रॅपर आणि गायक बादशाह याने देखील स्टेजवर उपस्थिती दाखवली. बादशाहच्या गाण्यावर कॅटने डान्स केला.

उत्तराखंडच्या औली येथे दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गत 18 जून ते 22 जूनदरम्यान झालेल्या या लग्नाला २०० कोटी खर्च आला. 200 कोटींच्या या लग्नात कतरीना कैफ, रॅपर बादशाह, उर्वशी रौतेला, टीव्हीची नागीन सुरभी ज्योती अशा अनेकांनी परफॉर्मन्स दिलेत. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंत यानेही या लग्नात परफॉर्म केले. ते सुद्धा ११ हजार फुट उंचीवर.अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. ‘बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ११ हजार फुट उंचीवर गाणे एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे...,’असे त्याने लिहिले.

कतरीनानेही या शाही विवाह सोहळ्यात डान्स केला. कॅटने झीरो चित्रपटातील ‘हुस्न परचम’ या गाण्यावर डान्स केला. तिचा हा व्हिडिओ एका फॅनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  रॅपर आणि गायक बादशाह याने देखील स्टेजवर उपस्थिती दाखवली. बादशाहच्या गाण्यावर कॅटने डान्स केला. या दोघांच्या उपस्थितीमुळे विवाहासाठी आलेल्या मंडळी देखील थिरकताना दिसले. विवाह सोहळ्यात नागिन मालिकेतील सुरभी ज्योती देखील उपस्थित होती.

सुरभीने ‘पद्मावत’ चित्रपटातील पिंगा या गाण्यावर डान्स केला. तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पाहुण्यांच्या स्वागतासाठी औलीला 5 कोटी रूपयांच्या परदेशी फुलांनी सजवण्यात आले होते. एवढेच नाही तर लग्नासाठी चित्रपटांचे सेट उभारण्यात आले होते. तसेच लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील वेगळी होतीे. यासाठी 5 किलो चांदी वापरण्यात आली होती.  

टॅग्स :अभिजीत सावंतकतरिना कैफ