दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल कपूर यांच्या घरी करवाचौथचे (Karwa Chauth) व्रत साजरे झाले. अनेक सेलिब्रिटी या पुजेत सहभागी झालेत. अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर, अभिनेत्री नीलम, रीमा जैन, डेव्हिड धवन यांची पत्नी लाली धवन, कृषिका लुला, रवीना टंडन आदींनी एकत्र येत पतीच्या दीर्घायुष्याची कामना करणारे हे व्रत साजरे केले.
यावेळी सर्वांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना प्रचंड मिस केले. महिप कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर सर्वांचा एक फोटो शेअर केला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मिस यू श्री’, असे लिहिले. दरवर्षी श्रीदेवीही या पुजेत सहभागी होत. यंदा मात्र श्रीदेवी आपल्यात नाहीत. याचवर्षी फेबु्रवारीत त्यांचे निधन झाले. गतवर्षीही अनिल कपूर यांच्या घरीच करवा चौथची पुजा झाली होती. यावेळी श्रीदेवींनी जरीची साडी नेसली होती.याचवर्षी करवा चौथच्या पुजेसाठी रवीना टंडन लाल रंगाचा ड्रेस घालून पोहोचली.