Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aamir-Kartik Dance : आमिरसोबत कार्तिकचा डान्स, 'तूने मारी एंट्रिया' वर धरला ठेका, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 14:08 IST

आमिर अनेक दिवसांनंतर असा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने चर्चा होत आहे.

Aamir-Kartik Dance : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Amir Khan) नुकताच माजी पत्नी किरण रावसोबत स्पॉट झाला आहे. दोघेही भोपाळमधील एका लग्नात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य सचिन पायलटही (Sachin Pilot) उपस्थित होते. यासोबतच अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही लग्नात दिसले. आता हे लग्न कधी झाले याबाबत समजू शकलेले नाही पण तिथले सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आमिर आणि कार्तिकने स्टेजवर डान्स केला आहे.व्हिडिओमध्ये आमिर खान आणि कार्तिक आर्यन वऱ्हाड्यांबरोबर मनसोक्त नाचताना दिसत आहेत. 'तूने मारी एंट्रिया' या गाण्यावर दोघांनी ठेका धरलेला दिसतोय. दोघेही डान्स एंजॉय करत आहेत. आमिर अनेक दिवसांनंतर असा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने चर्चा होत आहे. या फंक्शनमधले काही फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत ज्यात 'आमिर खान', 'किरण राव' आणि 'सचिन पायलट' बसलेले आहेत. 

'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान फारसा कुठे दिसून येत नाही. त्याने चित्रपटांमधूनही ब्रेक घेतल्याची चर्चा अलीकडेच सुरु झाली. सध्या तो परिवारासोबत वेळ घालवत आहे. नुकतंच आमिरच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. यातही आमिरचा लुक पाहून चाहते अवाक झाले होते. पांढरे केस, पांढरी दाढी, वाढलेलं पोट बघून आमिर म्हातारा झाला असं म्हणत त्याला ट्रोल केले गेले होते. आता आमिर लवकरच एका साऊथ दिग्दर्शकासोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :सोशल मीडियाकार्तिक आर्यनआमिर खाननृत्ययु ट्यूब