Kartik Aaryan Thrashes Man With Guitar: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुद्धा कार्तिक आर्यनने अभिनय क्षेत्रात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या कार्तिक त्याच्या आगामी 'आशिकी ३' चित्रपटासाठी खूप मेहनत घेतोय. ज्यामध्ये दक्षिणेकडील अभिनेता श्रीलीला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं सध्या शुटिंग सुरू आहे. यातच कार्तिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यन हा स्टेजवर गाणे गाताना दिसतोय. हिरव्या रंगाचा जॅकेट, पांढरा शर्ट, हातात गिटार आणि त्याच्या तोंडात सिगारेट दिसतेय. यावेळी आचानक तो रागावतो आणि गिटार काढून एका माणसाला मारहाण करायला लागतो. या व्हिडीओमध्ये श्रीलीलादेखील दिसतेय. खरं तर हा व्हिडीओ कार्तिकच्या आगामी 'आशिकी ३' सिनेमाच्या सेटवरील आहे. चित्रपटातील एक सीनचं लाईव्ह शूट सुरू होतं. त्यातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्तिकनं खऱ्या आयुष्यात कुणालाही मारहाण केली नाहीये.
अनुराग बसू यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'आशिकी ३' या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर श्रीलीला झळकणार आहे. यामधील तृप्ती डिमरी कार्तिकबरोबर स्क्रीन शेअर करणार होती. पण, तृप्ती डिमरीचा पत्ता कट करून श्रीलीला घेतलं आहे. १९९० मध्ये 'आशिकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये राहुल रॉय व्यतिरिक्त अनु अग्रवाल होती. यानंतर २०१३ मध्ये 'आशिकी २' आला. ज्यात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर दिसले होते. आता तिसरा भाग 'आशिकी ३' येतोय.
दरम्यान, कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाच्या अफेअरची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांआधी अभिनेत्याच्या घरातील एका कार्यक्रमातील श्रीलीलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला एक उत्कृष्ट डान्सर आहे. 'पुष्पा २' मधील आयटम सॉंगमुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. तसेच श्रीलीलाची 'गुंटूर करम' चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाण्यात महेश बाबूबरोबरील धमाकेदार डान्समुचीही सर्वत्र चर्चा झाली होती.