Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...तर कार्तिक आर्यनची अवस्था सुशांत सिंग राजपूतसारखी होईल"; प्रसिद्ध संगीतकाराचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:50 IST

प्रसिद्ध गायक-संगीतकार अमाल मलिकने कार्तिक आर्यनविषयी काळजी व्यक्त केली आहे. याशिवाय धक्कादायक विधान केलं आहे

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आणि सर्वांना धक्का बसला. अशातच प्रसिद्ध संगीतकार अमाल मलिकने अभिनेता कर्तिक आर्यन विषयी एक महत्त्वाचा दावा केला आहे. अमालने म्हटलंय की, "जशी वागणूक सुशांत सिंह राजपूतला बॉलिवूडमध्ये मिळाली, तसंच काहीसं आता कर्तिक आर्यनसोबत घडत आहे." त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या.

अमाल मलिकने कार्तिकविषयी केलं मोठ विधान

अमाल मलिकने मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “बॉलिवूडमधील काही मोठे लोक, निर्माते आणि कलाकार मिळून कार्तिक आर्यनवर दबाव आणत आहेत. सुशांतला जसं चित्रपटातून काढून टाकलं गेलं, गप्प बसवलं गेलं, तसाच प्रकार आता कार्तिकबाबत होताना दिसतोय. कार्तिक खूप मेहनती आहे. त्याने स्वतःच्या ताकदीवर हे स्थान मिळवलं आहे. त्याला कुणी गॉडफादर नाही, तरीही तो चांगलं काम करतोय. पण त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. लोक त्याला मागे ढकलत आहेत.”

अमाल पुढे म्हणाला की, "बॉलिवूडमध्ये काही लोकांचं सत्ताकारण चालतं. जे लोक त्यांच्या गटात नसतात, त्यांना काम मिळू नये यासाठी प्रयत्न केला जातो. अशा वातावरणात टिकून राहणं कठीण असतं. कार्तिकला त्याच्या आई-वडिलांचा मजबूत आधार आहे. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खंबीर राहतोय आणि स्वतःचं स्थान टिकवून आहे,” असं ते म्हणाले." अशाप्रकारे अमालने कार्तिकविषयी काळजी व्यक्त केली. कार्तिक आर्यननच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो शेवटी 'भूल भूलैय्या ३', 'चंदू चॅम्पियन' यांसारखे सिनेमे गाजले. कार्तिक सध्या त्याच्या आगामी 'आशिकी ३' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनसुशांत सिंगसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड