Join us

Sunjay Kapur : मित्रांसोबत रात्र घालवायला सांगितली, मारहाण केली अन्...; करिश्माने एक्स पतीवर केलेले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:58 IST

Sunjay Kapur Death : करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरचे निधन झाले आहे. या जोडप्याच्या वैवाहिक जीवनात खूप तणाव होता. घटस्फोटादरम्यान अभिनेत्रीने संजयवर खूप गंभीर आरोप केले होते.

करिश्मा कपूर(Karisma Kapoor)चा एक्स पती आणि उद्योगपती संजय कपूर(Sanjay Kapur) चे गुरुवारी युकेमध्ये पोलो खेळत असताना वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पण तुम्हाला माहिती आहे का की, करिश्मा आणि संजय कपूर यांचे वैवाहिक जीवन खूप तणावपूर्ण होते. घटस्फोटाच्या कायदेशीर लढाईदरम्यान करिश्माने संजय कपूरवर अनेक गंभीर आरोप केले होते.

करिश्मा कपूरने २९ सप्टेंबर २००३ रोजी मुंबईतील कृष्णा राज बंगला येथील तिच्या घरी पारंपारिक शीख पद्धतीने बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले. या जोडप्याला समायरा आणि एक मुलगा कियान ही दोन मुले आहेत. २०१४ मध्ये संजय आणि करिश्मा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मात्र २०१५ मध्ये त्यांनी त्यांची संमती मागे घेण्यासाठी अर्ज केला आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट हा एक हाय-प्रोफाइल खटला बनला, ज्यामध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले.

करिश्माचा तिच्या पतीने हनीमूनवर लिलाव केला होतामीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माने संजयवर धक्कादायक आरोप केला आणि दावा केला की संजयने तिचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिवूड शादीच्या रिपोर्टनुसार, करिश्माने तिच्या एका याचिकेत तिच्या हनीमूनच्या घटनेचा उल्लेख केला होता. तिने सांगितले होते की संजय कपूरने तिचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्याच्या मित्रांसोबत रात्र व्यतित करण्यास भाग पाडले. जेव्हा तिने तसे करण्यास नकार दिला तेव्हा संजयने अभिनेत्रीला मारहाण केली आणि तिच्या एका मित्राला तिची किंमत सांगितली.

करिश्माने संजय आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता२०१६ मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूर आणि त्याच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये त्याच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. करिश्मा कपूरने दावा केला होता की जेव्हा ती प्रेग्नेंट होती, तेव्हा संजयने त्याच्या आईला सांगितले होते की ही ड्रेसमध्ये फिट बसत नसेल तर तिला थापड मार.

हुंड्यासाठीही दिलेला त्रासकरिश्माने संजयविरुद्ध हुंड्यासाठी त्रास दिल्याचाही खटलाही दाखल केला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी संजयला समन्स पाठवले होते. हे सर्व आरोप तेव्हा सुरू झाले जेव्हा करिश्माने दावा केला की, संजय तिला आर्थिक मदत करण्यास तयार नाही. म्हणून, तिने तिची संमती मागे घेतली आणि मीडियासमोर गंभीर आरोप करायला सुरुवात केली. अखेर, २०१६ मध्ये, दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, न्यायालयाने करिश्मा आणि संजयचा घटस्फोट मंजूर केला. त्यानंतर संजयने १३ एप्रिल २०१७ रोजी प्रिया सचदेवशी लग्न केले.

टॅग्स :करिश्मा कपूर