Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो, करिश्मा कपूरचा सिनेमा पाहणे चाहत्याला पडले होते महागात, भोगावी लागली होती शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:36 IST

१९९७ मध्ये आमिर खान आणि करिश्माचा राजा हिंदुस्तानी सिनेमा प्रदर्शित झाला होता. करिश्माचा सिनेमा प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी निरहुआ सिनेमा पाहायचा.

90 चं दशक करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाने गाजवले. तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यावर चाहते फिद व्हायचे. रुपेरी पडद्यावरील तिची प्रत्येक झलक चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली. एक से बढकर एक हिट सिनेमा देत करिश्मा कपूर बॉलिवूडची आघाडीची आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. करिश्मा कूपरचा सिनेमा पाहण्यासाठी चाहतेही सिनेमागृहात गर्दी करायचे. प्रत्येक्षात तिची झलक पाहणे शक्य नसले तरी रुपेरी पडद्यावर तिला पाहण्यासाठी तिच्या प्रत्येक सिनेमालाही तितकीच गर्दी असायची. 

 

एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी करिश्मा आज सिनेमापासून लांब असली तरी तिची जादू आजही कायम आहे. आजही चाहते तिच्यावर तितकेच प्रेम करतात. करिश्माचा जगभरात चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक चाहत्याची काही ना काही खास बात असते. अशाच करिश्माचा जबरा फॅनचा किस्सा नेहमीच चर्चत असतो. करिश्माचा चाहत्याला तिचा सिनेमा पाहणे महागात पडले होते. वाचून आश्चर्य वाटले असणार पण हे खरंय.

तिच्या एका चाहत्याला करिश्माचा सिनेमा पाहिल्यामुळे शिक्षा भोगावी लागली होती.विशेष म्हणजे करिश्माचा हा चाहता आज मोठा सेलिब्रेटी बनला आहे. त्यानेही अभिनयक्षेत्रात प्रचंड नाव कमावले आहे.त्याचे नाव आहे निरहुआ. निरहुआ भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार आहे. निरहुआने करिश्माचा सिनेमा पाहण्यासाठी नियम मोडल्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागली होती असे खुद्द त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

१९९७ मध्ये आमिर खान आणि करिश्माचा राजा हिंदुस्तानी सिनेमा प्रदर्शित झाला होता. करिश्माचा सिनेमा प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी निरहुआ सिनेमा पाहायचा.पण राजा हिंदुस्तानी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा निरुहुआ एनसीसी कॅम्पमध्ये होता त्याला पहिल्याच दिवशी सिनेमा पाहणे शक्य नव्हते.सिनेमा पाहण्यासाठी त्याने खोटं बोलून सिनेमा पाहायला गेला होता. सिनेमा पाहून परतल्यावर त्याला खूप उशिर झाला होता. त्यामुळे निरहुआच्या शिक्षकांनी त्याला रात्री बाहेर झोपण्याची शिक्षा दिली आणि ग्राऊंडवरही त्याला अनेक चक्करही मारायला सांगितल्या होत्या. निरहुआ करिश्माचा इतका मोठा चाहता आहे की, त्याने त्याच्या सिनेमाचे नाव निरहुआ हिंदुस्तानी ठेवले होते. हा सिनेमा हिटही झाला होता.

टॅग्स :करिश्मा कपूर