Join us

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मानं घेतलं अर्धवट शिक्षण, मोडली कुटुंबाची परंपरा; आता आहे सिंगल मदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 16:56 IST

९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता.

 ९० च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर. कपूर कुटूंबात आणि बॉलीवूडमध्येही करिष्मा कायम एक ट्रेण्डसेटर म्हणून ओळखली गेली. शो मॅन राज कपूर यांची नात आणि रणधीर कपूर- बबिता यांची ही लाडकी लेक. तिला लोलो हे नाव कसं पडलं, याचं अनेकांना कुतूहल वाटतं. तिच्या या नावाचं कारण आहे तिची आई बबिता. बबिता यांनी Gina Lollobrigida या हॉलीवूड अभिनेत्रीच्या नावावरून करिष्माला लोलो म्हणायला सुरुवात केली आणि पुढे ती त्याच टोपन नावाने ओळखली जाऊ लागली. लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले आणि  शिक्षण अर्ध्यावर सोडून अभिनेत्री होण्याचे ठरवले.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी करिष्मा ही कपूर खानदानातली पहिली मुलगी. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने प्रेम कैदी हा चित्रपट साईन केला होता. यानंतर करिष्माने अनेक चित्रपट केले आणि यापैकी तिचे बहुतांश चित्रपट हिट ठरले. ९० च्या दशकातली हाय पेड अभिनेत्री म्हणून करिष्मा ओळखली जाते.  राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या यशाने करिष्माला करिअरमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. प्रेम कैदी, अनाडी, राजा बाबू, कुली नंबर १, साजन चले ससुराल, जीत अशा चित्रपटानंतर करिश्मा कपूरच्या हाती हा एक सिनेमा लागला आणि सगळंच बदललं.

करिश्मा कपूरनेही आपल्या कुटुंबाची परंपरा मोडली. करिश्माच्या आधी कपूर खानदानच्या मुली चित्रपटात काम करत नव्हत्या. किंबहुना राज कपूर यांनी आपल्या कुटुंबासाठी एक परंपरा निर्माण केली होती असे म्हणतात. ज्यामध्ये त्यांनी कपूर कुटुंबातील मुली चित्रपटात काम करणार नसल्याचे सांगितले होते. करिश्मा कपूरने ही परंपरा तोडली. मात्र, याआधी शशी कपूर यांची मुलगी संजना कपूरनेही चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजनाने 1981 मध्ये 36 चौरंगी लेनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक चित्रपट करूनही संजना कपूर स्टार होऊ शकली नाही. यानंतर करिश्मा कपूरने ही परंपरा मोडीत काढत अनेक यशस्वी चित्रपट दिले.

करिअरमध्ये अतिशय यशस्वी ठरलेली करिष्मा रिलेशनशिपच्या बाबतीत मात्र अपयशी ठरली. अभिषेकसोबत तर तिचा साखरपुडा होऊन मोडला. पण त्याआधी अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासोबतही तिचं नाव जोडल्या गेलं होतं. एवढंच नाही तर सलमान खानसोबतही तिचं नाव जोडलं गेलं. पण यापैकी कोणतंही रिलेशन पुढे जाऊ शकलं नाही.  अभिषेकशी साखरपुडा मोडल्यानंतर २००३ साली तिनं अतिश्रीमंत उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केलं. त्यांना समायरा आणि किआन ही दोन मुलंही आहेत. पण २०१६ साली दोघांनी घटस्फोट घेतला..

 

टॅग्स :करिश्मा कपूरसेलिब्रिटी