Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी 'या' अभिनेत्रीला ऑफर झालेला सुपरहिट 'राजा हिंदुस्थानी', तिच्या नकाराने चमकलं करिश्मा कपूरचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:14 IST

'राजा हिंदुस्थानी' करिश्माआधी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला ऑफर झालेला पण.... (raja hindustani)

आमिर खान-करिश्मा कपूर यांचा 'राजा हिंदुस्थानी' सर्वांना आठवत असेलच. या सिनेमातील गाणी, प्रसंग, आमिर-करिश्माची केमिस्ट्री यांची चांगलीच चर्चा झाली. १९९६ साली रिलीज झालेल्या 'राजा हिंदुस्थानी'ची आजही तितकीच चर्चा होते. 'राजा हिंदुस्थानी' सिनेमा करिश्मा कपूरच्या कारकीर्दीतला माईलस्टोन सिनेमा ठरला. या सिनेमामुळे करिश्मा कपूरच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळाली. पण करिश्माला ऑफर होण्याआधी हा सिनेमा एका वेगळ्याच अभिनेत्रीला ऑफर झालेला. कोण होती ती?

करिश्माआधी या अभिनेत्रीला सिनेमा झालेला ऑफर

'राजा हिंदुस्थानी' सिनेमातील आमिर-करिश्माची जोडी चांगलीच गाजली. हा सिनेमा करिश्माआधी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ऑफर झालेला. ऐश्वर्याने नकार दिल्याने पुढे हा सिनेमा करिश्मा कपूरला मिळाला. ऐश्वर्याने 'राजा हिंदुस्थानी'ला नकार का दिला याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. ऐश्वर्या म्हणालेली की, "मिस इंडियाची तयारी करत असल्याने मी 'राजा हिंदुस्थानी'ला नकार दिला." पुढे हा सिनेमा करिश्मा कपूरला मिळाला आणि तिने खऱ्या अर्थाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 

ऐश्वर्याने दिला नकार, करिश्माचं नशीब उजळलं

पुढे मग करिश्माने या सिनेमात काम केलं. १९९६ साली हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमातील आमिर-करिश्माच्या लिपलॉक सीनची चांगलीच चर्चा झाली. आजही हा सिनेमा लोकांचा फेव्हरेट आहे. टीव्हीवर किंवा ओटीटी माध्यमात हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. जर ऐश्वर्याने 'राजा हिंदुस्थानी'ची ऑफर स्वीकारली असती तर तिचा फिल्मी कारकीर्दीतला हा पहिला सिनेमा ठरला असता. परंतु या सिनेमात काम केल्याने करिश्मा कपूरच्या करिअरला नवी दिशा मिळाली.

टॅग्स :करिश्मा कपूरऐश्वर्या राय बच्चनआमिर खानमिस इंडिया