Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kareena Kapoor : तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काय मशीन आहे? करिना कपूर असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:58 IST

Kareena Kapoor : एका मुलाखतीत करिना वेगळीच रिअ‍ॅक्ट झाली. वाचा, ती काय म्हणाली?

अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये व्हॅकेशनवर गेली होती. सैफ, दोन्ही मुलं तैमूर व जेह यांच्यासोबत तिने लंडनमध्ये धम्माल मज्जा केली. पण याच लंडनमधून तिच्या प्रेग्नंसीचीही बातमी आली. होय, लंडन व्हॅकेशनदरम्यानचा करिनाचा एक फोटो व्हायरल झाला आणि बेबो तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली. दुसऱ्याच दिवशी असं काहीही नसल्याचं बेबोने सोशल मीडियावर पोस्ट करून स्पष्ट केलं. आता करिना यावर सविस्तर बोलली आहे.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती यावर व्यक्त झाली. 

काय म्हणाली करिना?एखाद्या महिलेचं वजन वाढायला लागलं की, ती प्रेग्नंट आहे ही पहिली गोष्ट लोकांच्या डोक्यात येते, तुझं याबद्दल काय मत आहे? असा प्रश्न करिनाला या मुलाखतीत विचारला गेला. यावर करिना अनपेक्षितपणे रिअ‍ॅक्ट झाली. म्हणजे, तुम्हाला काय म्हणायचं आहे मी प्रेग्नंट आहे? मी पुन्हा बाळाला जन्म देणार आहे? मी काय मशीन आहे? हा निर्णय माझ्यावर सोडून द्या, असं करिना म्हणाली. मित्रांनो आम्ही सुद्धा तुमच्यासारखी माणसं आहोत. प्रेग्नंसीच्या बाबतीत मी खूप प्रामाणिक राहिली आहे. प्रेग्नंसीच्या कठीण काळात मी पूर्ण आठ-नऊ महिने काम केलं. मी काहीही लपवत नाही. मी फक्त इतकंच सांगू इच्छिते की, सर्वांना आपल्या मनासारखं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं ती म्हणाली.

40 दिवसांत मी किती पिझ्झा खाल्ला...ज्या फोटोवरून करिनाच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली, त्या फोटोवरही ती बोलली. मी 40 दिवसांच्या सुट्टीवर होते. कुटुंबासोबत या 40 दिवसांत मी किती पिझ्झा खाल्ला असेल, याची मोजदाद नाही. फोटो व्हायरल झाल्यावर अखेर मला खुलासा करावा लागला. चिल, इट्स ओके. आम्ही सुद्धा माणसं आहोत, असं ती म्हणाली.

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूड