Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी भगवंत मान यांना मस्का लावतो आहेस का?; नेटिझनच्या प्रश्नावर कपिल शर्मा काय म्हणाला वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 21:02 IST

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकतंच शहीद दिनानिमित्त भगवंत मान यांनी आपल्या वतीनं जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं.

पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या खूप चर्चेत आले आहेत. नुकतंच शहीद दिनानिमित्त भगवंत मान यांनी आपल्या वतीनं जनतेला दिलेलं वचन पूर्ण केलं. यावर भगवंत मान यांनी एक व्हिडिओही जारी केला होता. कॉमेडियन कपिल शर्मानं देखील भगवंत मान यांचं अभिनंदन करणारा हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर कपिल शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. लोकांनी कपिल शर्माना टोमणे मारण्यास सुरुवात केली आहे. पण, कपिल शर्मानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

कपिल शर्माला टॅग करत एका ट्विटर युझरनं म्हटलं की, "हरभजनप्रमाणे तुही राज्यसभेच्या तिकिटासाठी मस्का लावत आहेस का?". या ट्विटची कपिलनं दखल घेत क्षणाचाही विलंब न करता जशास तसं उत्तर दिलं आहे. "मित्तल सर नाही. देशाची प्रगती व्हावी हेच फक्त एक स्वप्न आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या नोकरीसाठी शब्द टाकू का?", असा टोला कपिल शर्मा यानं लगावला आहे. 

कपिल शर्माच्या या उत्तराचीही चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. "आता यांना कपिल सरांचंच स्वप्न पडू लागेल, कारण चक्क त्यांच्या ट्विटला कपिल पाजी यांनी रिप्लाय दिलाय". काहींनी तर चक्क त्यांची शैक्षणिक पात्रताच कपिलला सांगून टाकली. त्यांना खरंच असं वाटलं की कपिल नोकरीसाठी शब्द टाकणार आहे. 

भगवंत मान यांनी नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजकीय क्षेत्रात येण्याआधी ते एक अभिनेते आणि कॉमेडियन होते. भगवंत मान यांनी कपिलसोबत खूप कामही केलं आहे. दोघंही एकाच कॉमेडी शोमध्ये दिसले होते. याआधी भगवंत मान यांनी पंजाबमध्ये अनेक कॉमेडी टीव्ही शो केले आहेत. 2011 मध्ये भगवंत मान राजकारणात आले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आठ वर्षे ते संगरूरचे खासदार होते. तर कपिल शर्मा सध्या टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत खूप सक्रिय आहे. कपिलची भगवंत मान यांच्याशी जुनी मैत्री आहे.

टॅग्स :कपिल शर्मा भगवंत मानआप