Join us

कपिल शर्माच्या शोबद्दल असा काही बोलला सुनील ग्रोव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:05 IST

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ही जोडी भविष्यातही अशीच हसवणार, असे वाटत असताना अचानक दोघांमध्ये भांडण झाले आणि ही जोडी तुटली.

ठळक मुद्देसुनील ग्रोव्हरसोबत भांडण झाल्यानंतर कपिलचा शो बंद पडला. यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले. पण आता कपिल पुन्हा नव्या दमाने टीव्हीवर पतरला आहे. त्याचा कपिल शर्मा शो पुन्हा एकदा हिट झाला आहे.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. ही जोडी भविष्यातही अशीच हसवणार, असे वाटत असताना अचानक दोघांमध्ये भांडण झाले आणि ही जोडी तुटली. भांडणानंतर शोमध्ये परत येण्यासाठी कपिलने सुनीलच्या अनेक मानमिनत्या केल्यात. पण सुनीलने कपिलसोबत काम करण्यास ठाम नकार दिला. अर्थात आता दोघांमधील मतभेद बरेच निवळले आहेत. अलीकडे एका इव्हेंटमध्ये सुनील ग्रोव्हर जे काही बोलला, त्यावरून तरी हेच दिसतेय. होय, कपिल शर्माचा शो माझ्या करिअरचा टर्निंग प्वार्इंट होता. कपिल शर्माच्या शोने मला प्रचंड प्रेम दिले. ओळख दिली. याच व्यासपीठामुळे मी घराघरांत पोहोचलो, असे सुनील म्हणाला.

मी कपिलला शोपूर्वीपासून ओळखत होतो. कॉमेडी सर्कसच्या शूटदरम्यान आम्ही एकमेकांना भेटलो होतो. किकू सोबत तर मी खूप साºया पार्ट्या केल्यात. कपिल शर्माच्या शोमध्ये आम्ही सर्वांनी एकत्र काम केले. मी परमेश्वराचे आभार मानतो की, मी या शोचा भाग होतो. कालांतराने मी या शोमधून बाहेर पडलो. कारण काहीही असो, पण या शोमधून बाहेर पडल्याचे मला दु:ख आहे आणि कायम असेल. अनेक गोष्टी विधीलिखीत असतात. कदाचित आमची सोबत इथपर्यंतचं लिहिली होती, असेही सुनील म्हणाला.

तुम्हाला माहित आहेच की, सुनील ग्रोव्हरसोबत भांडण झाल्यानंतर कपिलचा शो बंद पडला. यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले. पण आता कपिल पुन्हा नव्या दमाने टीव्हीवर पतरला आहे. त्याचा कपिल शर्मा शो पुन्हा एकदा हिट झाला आहे. दुसरीकडे सुनीलचा ‘कानपूरवाले खुराना’ हा कॉमेडी शोही चर्चेत आहे.

टॅग्स :कपिल शर्मा सुनील ग्रोव्हर