Join us

आता आमच्यात कुठलेही गैरसमज नाहीत! कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हरचे भांडण अखेर मिटले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 21:02 IST

कपिल व सुनीलमधील नाते सुधारले आहे. पुढचे पाऊल म्हणजे, कपिल व सुनीलने पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडणाची बरीच चर्चा झाली. हा वाद इतका गाजला आणि इतका विकोपाला गेला की, सुनीलने कपिलसोबतचे सगळे संबंध तोडले. कपिलने याऊपरही सुनीलसोबत पॅचअप करण्याचे बरेच प्रयत्न करून पाहिलेत. पण या भांडणानंतरच्या प्रत्येक मुलाखतीत सुनील कपिलबद्दल अतिशय कोरडेपणाने बोलताना दिसला. पण ताज्या बातम्यांनुसार, कपिल व सुनीलमधील नाते सुधारले आहे. याचे पुढचे पाऊल म्हणजे, कपिल व सुनीलने पुन्हा एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे.आता तर कपिलने खुद्द या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या व सुनीलच्या काही भेटी झाल्यात. आता आमच्यात कुठलेही गैरसमज वा भांडण उरलेले नाही. सगळे काही जुळून आले तर कपिल व सुनीलची धमाकेदार जोडी पुन्हा एकत्र दिसेल, असे कपिल म्हणाला. आमच्यात भांडण खरे तर मीडियाने निर्माण केले होते. आमच्यात चांगले बॉन्डिंग आहे, असेही कपिल म्हणाला.सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणानंतर कपिल शर्मा दीर्घकाळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. मध्यंतरी डिप्रेशन, व्यसन, मीडियासोबतचा वाद अशा अनेक वाईट कारणांमुळे कपिल चर्चेत राहिला. पण आता कपिल पुन्हा एकदा दमदार कमबॅकच्या तयारीत आहे. सध्या कपिल आपल्या होम प्रॉडक्शनच्या सन आॅफ मनजीत सिंह या पंजाबी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

 

टॅग्स :कपिल शर्मा सुनील ग्रोव्हर