Join us  

कपिल शर्माने केली चूक मान्य; 5 वर्षांनंतर सांगितलं सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:59 AM

Kapil sharma: एका भांडणामुळे या दोघांच्या मैत्रीत फूट पडली. तेव्हापासून ही जोडी अजूनपर्यंत एकदाही एकत्र आलेली नाही.

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (kapil sharma) आणि अभिनेता, कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. एकेकाळी या दोघांमध्ये पडलेली वादाची ठिणगी आजही कायम आहे. एका भांडणामुळे या दोघांच्या मैत्रीत फूट पडली. तेव्हापासून ही जोडी अजूनपर्यंत एकदाही एकत्र आलेली नाही. विशेष म्हणजे या वादावर सुनील ग्रोव्हरने अनेकदा त्याची प्रतिक्रियाही दिली. मात्र, कपिल शर्मा कायम त्याविषयी भाष्य करण्यास टाळाटाळ करत होता. मात्र, एका मुलाखतीमध्ये त्याने पहिल्यांदाच सुनीलसोबत असलेल्या वादावर भाष्य केलं असून स्वत:ची चूक मान्य केली आहे.

कपिल लवकरच 'ज्विगोटा' या आगामी सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे कपिल सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यात अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सुनीलसोबत झालेल्या वादाविषयी भाष्य केलं आहे.विशेष म्हणजे ५ वर्षानंतर त्याने त्याची चूक कबूल केली आहे. 

अखेर कपिल मान्य केली चूक

"मला ही गोष्ट स्वीकारताना कोणताही कमीपणा वाटत नाही. मला अगदी कोणत्याही लहानसहान गोष्टीवरुन लगेच राग येतो. मी लोकांवर प्रेम करतो. पण, मला राग आल्यावर माझा माझ्यावर ताबा राहात नाही. पण, आता माझ्या स्वभावात खूप बदल झाला आहे. लोकं म्हणतात, मी त्यांचा शत्रू आहे. पण, मी कोणालाही माझा शत्रू मानत नाही", असं कपिल म्हणाला.

दरम्यान, २०१८ मध्ये सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यात वादाची ठिणगी पडली. कपिल आणि सुनील एकमेकांचे खूप जवळचे आणि चांगले मित्र होते. मात्र, विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला. या घटनेनंतर सुनीलने द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला. कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्याला यश मिळालं नाही.

टॅग्स :कपिल शर्मा सुनील ग्रोव्हरटेलिव्हिजनसिनेमाबॉलिवूड