Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रनौतची सत्र न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 08:06 IST

सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडून हे प्रकरण अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्यास मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी ऑक्टोबरमध्ये नकार दिला होता. कंगनाने बोरिवली सत्र न्यायालयात केलेल्या पुनर्विचार अर्जात म्हटले आहे की, अर्जदाराला (तिची केस) जाणूनबुजून दुखापत पोहोचविण्यासाठी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा विचारच मुख्य दंडाधिकाऱ्यांनी केला नाही. 

टॅग्स :कंगना राणौतजावेद अख्तर