Emergency OTT Release: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १७ जानेवरी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा चित्रपट १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केलंय. आता जे प्रेक्षक 'इमर्जन्सी' चित्रपटगृहात जाऊन पाहू शकले नाहीत ते आता घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. 'इमर्जन्सी' ची OTT रिलीज डेट जाहीर केली आहे.
कंगना राणौतने 'इमर्जन्सी' च्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिनं याबाबत माहिती शेअर केली आहे. तिनं पोस्टसोबत लिहिलं, '१७ मार्च रोजी netflix वर रिलीज होत आहे. 'इमर्जन्सी' सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Netflix वर (Emergency Release On Netflix Ott Platform) दिसणार आहे. १७ मार्च २०२५ पासून प्रेक्षक हा सिनेमा तिथे पाहू शकतील. ही आनंदाची बातमी मिळाल्यानं चाहते खुश आहेत.
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'नं Sacnilk.com नुसार भारतात २१.६५ कोटींची कमाई केली. कंगनाने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही तर त्याचे दिग्दर्शनही केले. 'इमर्जन्सी'मध्ये अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाख नायर, मिलिंद सोमण आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत. दरम्यान हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सिनेमावर पंजाबमध्ये बंदीची मागणी करण्यात आली होती. सेन्सॉरने सिनेमावर कात्री लावून काही सीन्स हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.