Join us

कंगनाच्या 'इमर्जन्सी' प्रदर्शनावर 'या' देशात बंदी, भारतासोबतच्या बिघडणाऱ्या संबंधांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 10:19 IST

कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे.

Kangana Ranaut Movie: अभिनेत्री कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पुढील काही दिवसात रिलीज होणार आहे. कंगना राणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तसेच तिनेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कंगनाचा हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. पण, तो वादात अडकला होता. अखेर काही काही सीन्स कट केल्यानंतर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला होता. आता पुन्हा हा सिनेमा वादात अडकला आहे. 'इमर्जन्सी' हा सिनेमा बांगलादेशमध्ये प्रदर्शित होणार नाही.

बांगलादेशमध्ये 'इमर्जन्सी'चे प्रदर्शन (Emergency Banned In Bangladesh) होणार नाही.  हा निर्णय भारत आणि बांगलादेशमधील सध्याच्या ताणलेल्या संबंधांशी जुडलेला आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत. तसेच बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात इंदिरा गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले. १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धात भारतीय लष्कर आणि इंदिरा गांधी सरकारची भूमिका आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांना दिलेल्या पाठिंब्यावर प्रकाश टाकणारी आहे. 

'इमर्जन्सी' हा बांगलादेशात बंदी घातलेला पहिला भारतीय चित्रपट नाही. यापूर्वी 'पुष्पा २' आणि 'भूल भुलैया ३' सारख्या चित्रपटांनाही बांगलादेशात प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कंगना राणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, अशोक छाबरा, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाख नायर आणि सतीश कौशिक अभिनीत 'इमर्जन्सी' १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची थेट टक्कर अमन देवगण आणि राशा थडानी यांच्या 'आझाद' या चित्रपटाशी होणार आहे. हा चित्रपट राशा थडानीचा पहिला चित्रपट आहे. कंगनाचे मागे प्रदर्शित झालेले काही चित्रपट धडाधड फ्लॉप झालेत. त्यामुळे आता 'इमर्जन्सी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.  

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबांगलादेशइंदिरा गांधी