Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतने निवडणुक लढवावी का? विचारताच मनोज वाजपेयी स्पष्टच म्हणाले, "मला वाईट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 17:19 IST

मनोज वाजपेयींनी कंगना रणौतने निवडणुक लढवावी की नाही यावर त्यांचं स्पष्ट मत मांडलंंय.काय म्हणाले मनोज? बघा

अभिनेते मनोज वाजपेयी हे बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते. मनोज यांनी विविध भूमिका साकारून चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. केवळ सिनेमेच नाही तर ओटीटी माध्यम सुद्धा त्यांनी गाजवलं आहे. मनोज वाजपेयी सहसा राजकीय - सामाजिक विषयांवर जाहीरपणे बोलणं टाळतात. पण अलीकडेच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मनोज अनेक विषयांवर व्यक्त झाले.

याच मुलाखतीत अभिनेत्री कंगना रणौतने निवडणुक लढवावी का, असा प्रश्न मनोज यांना विचारण्यात आला. त्यावेळी मनोज म्हणाले, "कंगना एक असामान्य प्रतिभेची अभिनेत्री आहे. तिने खुप कमाल अभिनय केलाय. मी जेव्हा तिचा पहिला सिनेमा गँगस्टर आणि नंतर वो लम्हे पाहिला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. इतक्या कमी वयात तिने जो अभिनय केलाय त्याला खरंच तोड नाही."

मनोज वाजपेयी पुढे म्हणाले, "कंगना रणौत यंदा निवडणुकीला उभी राहतेय हे मी कुठेतरी वाचलं. ती खुप चांगली अभिनेत्री आहे यात शंका नाही. त्यामुळे अशी अभिनेत्री जेव्हा निवडणुकीला उभी राहतेय हे मला समजलं आणि खुप वाईट वाटलं." अशाप्रकारे मनोज वाजपेयींनी स्पष्टपणे त्यांच्या मनातली प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज वाजपेयी लवकरच त्यांचा १०० वा सिनेमा 'भैय्याजी' घेऊन येत आहेत.

 

टॅग्स :मनोज वाजपेयीकंगना राणौतनिवडणूक