Join us
Daily Top 2Weekly Top 5

 इन आंखो की मस्ती...! अन् रेखा-कंगना राणौतने धरला ठेका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:09 IST

सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली.

ठळक मुद्देकंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली. या अवॉर्ड फंक्शनचे काही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कंगना ही सदाबहार अभिनेत्री रेखासोबत दिसतेय. फोटोतील दोघींचे बॉन्डिंगही पाहण्यासारखे आहे. याऊपरही एक खास बात म्हणजे, दोघींच्याही साड्या. या अवॉर्ड फंक्शनमध्ये कंगना कांजीवरम साडी नेसून आली. ही साडी खुद्द रेखा यांनी कंगनाला भेट दिलेली होती.

यावेळी रेखा याच्या हस्ते कंगनाला अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. यानंतर रेखा यांनी कंगनाला आपल्या गाण्यांच्या काही डान्स स्टेप्सही शिकवल्या. ‘इन आंखो की मस्ती’ आणि ‘परदेसिया’ या गाण्यांवर रेखा व कंगना दोघींनीही ठेका ठरला. याशिवाय एका मराठी गाण्यावरही दोघी थिरकताना दिसल्या. या अवॉर्ड फंक्शनमध्ये सरोज खान यांनीही हजेरी लावली. रेखा व कंगना दोघीही सरोज खान यांना भेटायल्या गेल्यात.

कंगनाचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे कंगना प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ला बॉक्सआॅफिसवर किती यश मिळते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतरेखामाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी