गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रकरणाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. हे प्रकरण म्हणजे जावेद अख्तर-कंगना राणौतमध्ये (kangana ranaut) सुरु असलेला कोर्टाचा खटला. पण दोघांनीही आज एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करुन सर्वांनाच सुखद धक्का दिलाय. जावेद अख्तर (javed akhtar) आणि कंगना राणौत यांच्यातील वाद आता मिटला असून कंगनाने जावेद यांच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. काय म्हणाली कंगना? जाणून घ्या.
जावेद अख्तर-कंगनामधील वाद मिटलाकंगनाने सोशल मीडियावर जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करुन खास कॅप्शन लिहिलंय की, "मी आणि जावेद जी यांनी आमच्यातील कोर्टातलं प्रकरणं (मानहानीचा खटला) आता मिटवलं आहे. मध्यस्थी करुन आम्ही आमच्यामधील कायदेशीर लढत आता थांबवली आहे. गीतकार जावेद साब खूप दयाळू आणि उदार मनाचे आहेत. याशिवाय मी जो आगामी सिनेमा दिग्दर्शित करेन त्यासाठी जावेद जी गाणं लिहिणार असल्याचा होकार त्यांनी कळवला आहे."
जावेद अख्तर यांनी माझ्यावर हृतिकची माफी मागण्यासाठी दबाव टाकला, असा आरोप करुन कंगनाने तक्रार दाखल केली. पुढे जावेद यांनी कंगनावर मानहानीची केस दाखल केली. अखेर आज या दोघांमधील वादाचा शेवट सुखद झाला असं म्हणता येईल.