कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अभिनय कायमचा सोडण्याचा. होय, डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन 2’नंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ‘इंडियन 2’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या १४ डिसेंबरपासून ‘इंडियन 2’चे शूटींग सुरू होत आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘इंडियन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आहे. आपल्या ६४ व्या वाढदिवशी कमल हासन यांनी ‘इंडियन 2’ची घोषणा केली होती. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट काजल अग्रवाल दिसणार आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.
‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:23 IST
कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, कमल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
‘या’ चित्रपटानंतर कमल हासन घेणार ‘चित्रपट संन्यास’!!
ठळक मुद्दे वयाच्या तिस-या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवणारे व सुमारे २०० वर चित्रपटांत काम करणारे कमल हासल आता दक्षिण भारतातील राजकारणात आपले पाय पसरवू पाहत आहेत.