अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उजव्या पायाच्या हाडात इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. तूर्तास कमल यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रुग्णालयाच्या वतीने कमल हासन यांचे मेडिकल बुलेटिन जारी केले गेले. यात ही माहिती देण्यात आली आहे. कमल हासन श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये भरती आहेत.
‘कमल हासन यांच्या पायाच्या हाडात संक्रमण झाल्याने शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. टिबियल हाडातील संक्रमक फोकस हटवण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहे,’ असे त्यांच्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.कमल हासन यांच्या पायाला काही वर्षांपूर्वी इजा झाली होती. त्याच पायात संक्रमण झाले. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. कमल हासन सध्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा पक्ष तामिळनाडूतील आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह टॉर्च आहे.