Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे हे काजोल? अभिनेत्री झाली ट्रोल, लेक न्यासाही आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 16:46 IST

Kajol, Nysa Devgn : मायलेकींचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी दोघींना ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

काजोल (Kajol) व तिची लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) दोघींचीही सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. काजोल या ना त्या कारणानं चर्चेत असतेच. पण न्यासाचीही चर्चा कमी नाही.  ती सतत चर्चेत असते. तेवढीच ट्रोलही होते.आताही काजोल आणि न्यासा दोघीही ट्रोल होत आहेत. मायलेकींचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी दोघींना ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

काजोलला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केलं गेलं तर न्यासाला तिच्या लुक्समुळे. काजोल अलीकडे पिलाटे क्लासबाहेर दिसली. व्हिडीओत काजोलचं वजन बरंच वाढलेलं पाहून ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘हे लोक चित्रपटांत चांगलेच फिट दिसतात आणि रिअल लाईफमध्ये असे,’ अशी कमेंट एकाने केली.‘काय आहे हे काजोल, वजन का वाढतंय तुझं?’, असा सवाल एकाने केला. जाड झाली, अशा शब्दांत एकाने तिला ट्रोल केलं.

न्यासाही झाली ट्रोल

काजोलची लेक न्यासा देवगण हिचाही एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तिला नेहमीप्रमाणे कॉम्पलेक्शन आणि फिजिकसाठी ट्रोल केलं गेलं. ‘तोंडात विमल आहे, म्हणून मास्क घातला आहे,’ असं न्यासाचा व्हिडीओ पाहून एकाने लिहिले. ‘कलर कॉम्पलेक्शनवर खूप खर्च केलाय हिने,’ अशी कमेंट एकाने केली. ‘चला, हिची सुद्धा स्किन लाइटनिंग ट्रिटमेंट झाली. ब्लॅकची एकदम फेअर झाली,’ अशा शब्दात एका ट्रोलरने न्यासाला ट्रोल केलं.अर्थात हे पहिल्यांदा घडलं नाही. याआधीही अनेकदा न्यासा व काजोल अशाच पद्धतीने ट्रोल झाले आहेत.

टॅग्स :काजोलबॉलिवूड