Join us
Daily Top 2Weekly Top 5

जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:06 IST

जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार असून त्याने बायकोसोबत केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे (Justin Bieber)

जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर लवकरच बाबा होणार आहे. जस्टिनची बायको हैली ही गरोदर असून या दोघांनी केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे. जस्टिन आणि त्याची बायको हैली लवकरच आई-बाबा होणार आहेत. यानिमित्त या दोघांचे जगभरातील चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. जस्टिनने यानिमित्त इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शूट केलंय. 

जस्टिनने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये बघायला मिळतं की हे दोघं एकमेकांना किस करत आहेत. याशिवाय हैली तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत खास पोज देताना दिसते. हे फोटो ब्लॅक अंड व्हाईट अंदाजातले असून दोघांचाही रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय. जस्टिन आणि हैली यांच्या या फोटोशूटवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

जस्टिन बीबरचं संपूर्ण जगात फॅन फॉलोईंग आहे. भारतात सुद्धा जस्टिनचे अनेक चाहते आहेत. बेबी गाण्यामुळे जस्टिन फार कमी वयात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता करिअरच्या शिखरावर असताना जस्टिन वैयक्तिक आयुष्यातही सेटल व्हायच्या मार्गावर आहे. जस्टिनने काही दिवसांपुर्वी भारतात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं होतं. या कॉन्सर्टला भारतातल्या त्याच्या असंख्य फॅन्सनी गर्दी केली होती. 

टॅग्स :जस्टिन बीबरमराठीहॉलिवूड