Join us

बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे जॉनी लिव्हरचा मुलगा! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 20:32 IST

लवकरचं बॉलिवूडमध्ये आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर जेसी लिव्हरचा. होय, बॉलिवूडचा कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लिव्हर बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. 

लवकरचं बॉलिवूडमध्ये आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर जेसी लिव्हरचा. होय, बॉलिवूडचा कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी लिव्हर बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. त्याचे ताजे फोटो बघून तुम्हालाही आमचे म्हणणे पटेल. जेसीने आपली सिक्स पॅक अ‍ॅब्ज बॉडी दाखवणारे काही शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तुम्हाला कदाचितचं ठाऊक असेल की, जेसी १२ वर्षांचा असताना त्याच्या घशात ट्युमर झाला होता. त्याचा ट्युमर इतका वाढला होता की त्याने कॅन्सरचे रूप घेतले होते. यानंतर जेसीवर विदेशात उपचार झालेत आणि तो बरा झाला.

या आजारातून बाहेर पडल्यानंतर जेसीने शालेय शिक्षण पूर्ण केले. पण बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. अर्थात बहीण जेमी आणि पापा जॉनी यांनी समजवल्यानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरु केले. लंडनच्या ह््युमन रिसोर्सेसमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो बाहेर पडला.

 जेसी एक चांगला अभिनेता आहे, सोबतचं संगीताचाही जाणता आहे. पण मिमिक्रि आर्टिस्ट ही त्याची खास ओळख आहे. जेसीने सुरुवातीलच्या काळात काही कॉमेडी शो केले. पण त्यात त्याला यश आले नाही. जेसीचा एक म्युझिक ग्रूप आहे. आता कॉमेडी सोडून अभिनय आणि संगीत यावर त्याचा फोकस आहे.

जेसी सध्या आपल्या फिटनेसवर लक्ष देतोय. त्याचे वजन बरेच वाढले होते. पण गेल्या वर्षभरात जेसी एकदम फिट झाला आहे. २७ वर्षांच्या जेसीला आता बॉलिवूड खुणावू लागले आहे. त्याच्याकडे अनेक चित्रपटाच्या आॅफर्स आल्यात. पण मनासारखी भूमिका मिळत नाही, तोपर्यंत चित्रपट न करण्याचे त्याने ठरवले आहे.

टॅग्स :जॉनी लिव्हर